गांधारी
गांधारी
अंधारातला दिवा
पहात होता वाट
तेलाचा नाही तर तुपाचा
घातला होता घाट।
वाती होत्या ओल्या
दुःखाच्या सात
उदास वा-याची
होती तीला साथ।
दिवाळी च्या पणतीला
विकत होती गांधारी
रोषणाई होती परी
वाट असे अंधारी।
डोळयावरची पट्टी
झाली असती दूर
तर सत्य असत्याच्या
युद्धात वाहिला नसता
रक्ताचा महापूर।
महाभारतामध्ये होतीस
तूच महाराणी
बदलू शकली असतील
हुशारीने कहाणी।
मातृप्रेमात झालीस स्वार्थी
पाहावी लागली पुत्रांची अस्थी
शंभर पुत्र होऊनी झालीस
निपुत्रिकाची धनी।
अंध धृतराष्ट्राला घेऊन
आता फिरतेस वनाेवनी ।
विचारी गांधारी अपुल्या मना
पत्नी म्हणून चुकले कि
माता म्हणून चुकले
संसाराचे फासे सारे काही
उलटे पडले।
अजूनही अंधारात
आहे चाचपडत
अनुत्तरित प्रश्नांची मालिका
आहे भेडसावत ।
