विस्तव
विस्तव
गरीबीच्या विळख्यात
सापडला तो जरी
शिक्षणाची धुरा
जपतोय उरी।
चंद्र मौळी झोपडीत
नाही अभ्यासाला जागा
शिक्षणाची ओढ त्याच्या
लावी जीवा।
शिक्षणासाठी गेला
पळून तालुक्याला
पोरगं गेल कुठं
म्हणून घोर आईबापाला।
शोध घेतील म्हणून
लावलं नाव शाळेत खोटं
शिक्षणाच्या ध्येयाने
चालली हि हुशारीची नोट।
वीस वर्षाने बनला अधिकारी
आली आठवण आईबापाची
परतला जेंव्हा गावी
उभी इमारत,झोपडीच्या जागी ।
शोधून शोधून दमला
पुरामध्ये गमावले आईबापाला
ज्यांच्यासाठी आयुष्य केले स्वत:चे त्याने विस्तव
तेच नाहीत उपभोगाला हेच
खरे वास्तव।
