पत्रास कारण की
पत्रास कारण की
1 min
392
पत्रास कारण की,
दिवाळसण येत आहे
मुली ,तुझी आई
आतुरतेने वाट पाहत आहे।
सासरच्या दारी रांगोळीचे
भरलेस रंग इंद्रधनू
मायेची हाक ऐकू येते का
तुला ,जरा दमानं घे मनू।
पत्रास कारण की,
थकली आता गात्र मायबापाची
आस लागली तुझ्या आगमनाची।
संसारात रमलीस तरी
विसरू नकोस मायबापाला
माहेरच्या पारिजातकाचा
सुवास येईल या पत्राला।
पत्रास कारण की,
अनेक आशिर्वादाचा हात
सदैव राहो तुझ्या पाठीशी
मायबाप असतानाच
माहेर असतं गाठीशी।
पत्राचे कारण कळता
धावत ये लवकर
दिवाळीचा दिवा
उजळतो भरभर।
