मायबोली
मायबोली
1 min
148
अ आ आई
शिकवते मज
माझी मायबोली
आई हया शब्दातच
दिसे तिची खोली।
प्रभात काळी चाखावी
ओवी अवीट गोडीची
दिवसाच्या सुरूवातीला
येई स्वारी वासुदेवाची।
मराठी ची कोड कौतुके
सांगती ज्ञानदेव
तुकोबांच्या वाणीमध्ये
निघे जिवनरसाची ठेव।
वळावी तशी वळते मराठी
गजल, काव्यात खेळते मराठी
उसळत्या भाषणात ज्वलंत मराठी
शूरवीरांच्या गाथेत लढते मराठी।
माय मराठी असे
आमुची मातृभाषा
महाराष्ट्र प्रांताच्या बोलीभाषेचा
दाखवी ही आरसा।
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी
अभिजात दर्जा साठी
अजूनही वंचित मराठी।
