सहवास
सहवास
आजचा दिवस लग्नाच्या वाढदिवसाचा
एकत्र घालवलेल्या सुखदुःखाच्या आठवणींचा।
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन
विचारांच्या अदलाबदली चे जीवन।
कळतचं नाही वीण नवी नात्यांची
कधी होते जुनी
काळाच्या ओघात नांदतो आपण
संसाराच्या बनी।
मनात तुमच्या असेल किती जणींचा वास
आठवण करून देते आज
२६ वर्षाचा झाला आपला सहवास।
आशा करते असेलही माझ्यासाठी
ह्रदयात कप्पा खास।
