प्रणाम मायभूमीला
प्रणाम मायभूमीला
देश असे माझा भारत
सा-या धर्मांचे करीतो स्वागत
सारे करती त्याचा हेवा
एकीचा राखतो नेहमी ठेवा।
विविधता मध्ये एकता
असे त्याची खुबी
तरीपण मध्येच उघडते,
जातीधर्मव्देषाची डबी।
जय जवान, जय किसान
परंपरा असे देशाची
गरज उरली आता
वागणूक देण्या सन्मानाची।
हिमालय असे त्याची शान
मंगळावर पोहचले देशाचे यान
अभंगांच्या गाथेने , तंत्रज्ञानाच्या
वाटेने देश हो़ई महान।
तिरंगा अमुचा प्रिय परी
फडकत राहो सदा वरी
समृद्धतेची शपथ घेतो उरी
देशासाठी आता सर्व करी।
समृद्ध इतिहासाचा वारसा
हाच खरा देशाचा आरसा
ठेवूनी वीरांच्या बलिदानाची जाण
करू भारतदेशा असंख्य प्रणाम।
सुजलाम सुफलाम मंत्र जपूया
हरित क्रांतीची बाग फुलवूया
प्रत्येक भारतीयांच्या मनी राहो,
एकभाव प्रणाम मायभूमीला।
