महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र सर्वांचा
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र सर्वांचा
1 min
128
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र सर्वांचा
जिथे मराठी असे राजभाषा
महाराष्ट्र असे शिवरायांचा
ज्यांनी दाविली स्वराज्याची भाषा।
गडसौंदर्या ंनी नटलेला
बोलीभाषेत रमलेला
कृष्णा कोयना गोदावरी
नद्यांच्या प्रवाहात हिरवटलेला।
संतांच्या वाणीत गुंगलेला
विचारवंतांच्या शैलीने प्रकटलेला
विविध पाक संस्कृतीत घोळलेला
साज, पुतळया अलंकारांनी सजलेला।
गर्जा महाराष्ट्र शाहिरांच्या लेखणीचा
क्रिडा साहित्य विश्वातील अभिमानाचा
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र सर्वांचा।
