ओंजळीतील फुले
ओंजळीतील फुले
टवटवीत भावनांचा खेळ
तू मांडून गेलास
हिरव्या गार आशेचा
पाऊस देऊन गेलास।
चिंब पावसात
प्राजक्तही भिजला
तुझ्या अंगणात
प्रेमाचा सडा पडला।
जपून ठेवली
प्राजक्ताची ओंजळ
नियतीने का केला
अचानक गोंधळ।
साठवले मनी
आठवणींचे ठेले
दरवळती अजूनही
ओंजळीतील फुले।
