सलाम माझ्या सैनिकाला
सलाम माझ्या सैनिकाला
सैनिक म्हणूनी नेहमीच
तुमच्या विषयी असे अभिमान
भारतमातेच्या सुरक्षेची
तुम्ही च असे शान।
तुम्ही नसता तर
जीवन असे अमुचे सांशक
तुमच्या धैर्यापुढे असतो
आम्ही नतमस्तक।
तळहाताच्या मेंदीचे
सुकले हे रंग
भविष्याच्या स्वप्नांना
तुमचे शहिदत्व करी भंग।
जागृत राहावी तुमची जीवनज्याेत
असे कामना करतो नेहमी
सैनिकांच्या कुटुंबाची काळजी
घेणे, कर्तव्य समजतो आम्ही।
सलाम तुमच्या शौर्याला
सलाम तुमच्या शिस्तीला
तुमच्या निस्सीम देश भक्ती ला
सलाम माझ्या सैनिकाला।
गौरविण्यात येई तुम्हा
जेंव्हा प्रजासत्ताक दिनाला
उर आमचा भरून येतो
पाहूनी तुमच्या वीरचक्राला
