आस भक्ताची
आस भक्ताची
1 min
214
पंढरीच्या वारीला नाही
कशाचा पाड
तुम्हा आम्हा सर्वांचे
विठू करतो लाड।
सर्व धर्म समभाव
मंत्र असे वारीचा
दुमदुमतो गजर
रामकृष्ण हरीचा।
भक्ती रसाला
येतो जिथे महापूर
विठूमाऊलीचे असे
हे पंढरपूर।
आषाढी च्या वारीत
भिजती वारकरी
टाळमृदंग वाजे
पावसाच्या सरीत।
आतुरता मोराला
मुसळधार पावसाची
विठूमाऊलीला आस
लागे वारीच्या भक्तांची।
