STORYMIRROR

Aaliya Shaikh

Tragedy

3  

Aaliya Shaikh

Tragedy

माणुसकी हरवली की काय

माणुसकी हरवली की काय

1 min
327

घेतला चहासोबत सकाळी

 वाचण्यास हातामध्ये पेपर 

वाटलं वाचता वाचता द्यावी 

जराशी एक त्रुप्तीची ढेकर 

पहिलीच बातमी वाचताना 

एकदम डोळेच विस्फारले 

चिरले जणू काळीज माझे 

हात आपोआपच थरथरले 

एका कोवळ्या जीवावर हो 

मिळून हल्ला चार नराधमांचा 

अतिशयोक्ती करून त्यांनी 

दाबला होता गळा त्या जीवाचा 

प्रतिकार शक्ती कमी पडली 

दाखला दिला होता जखमांनी 

एवढे पुरे नव्हते का म्हणून 

जीभही कापली हैवानांनी

 रक्तबंबाळ अवस्थेत तिच्या

 बालमनाचा घोटला गळा

 किती किती सोसल्या असतील 

मरणोत्तर वेदनेच्या कळा 

अशा कितीतरी अत्याचाराला 

बळी पडत आहे आपली माय 

मनात एकच प्रश्नांचा काहूर 

माणुसकी हरवली की काय? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy