लेखणी
लेखणी
1 min
356
लेखणी माझा आधार असते नेहमी सोबती करिते
सदाच सांत्वन अश्रूंना माझ्या जपती
लेखणी जवळ असता उलगडा होतो मनाचा
अलगद अक्षरे उतरती भार कमी करे लोचनांचा
लेखणी माझी चालता व्यक्त करते भावनांना
शब्दाची माळ गुंफित मिळविते दोन जिवांना
या लेखणीस माझ्या आहे फार तिखटधार
नसे तमा कुणाचीच करते शब्दांचा प्रहार
लेखणी ही जीवनात मोलाचे कार्य करते
समाजास दिशा देऊन आधार स्तंभ बनते
