दिसत तस नसतं
दिसत तस नसतं
1 min
357
नाना तर्हेचे मुखवटे चेहऱ्यावर हो लावून
फिरत आहे आजकाल चांगुलकीचा सोंग घेऊन
प्रत्येक क्षेत्रात कार्य चालतेय वशिल्यावरुन
कामे होत नाही जोवर देत नाही टेबलाखालून
भेसळयुक्त वस्तुंचा होतोय सर्रास वापर
येऊन जाऊन फुटतोय फक्त गरीबांवर खापर
गरजेपुरते संबंध आता उरले फक्त नात्यामध्ये
लहान मोठ्यांचा मान देखाव्यासाठी फोटोमध्ये
दिसत तस नसतं ही उक्ती आता ठरतेय खरी
पूर्वीची अडाणी माणसं खरोखर होती खूप बरी
