ससोबा
ससोबा
ससोबा ससोबा
किती किती छान
पांढरा शुभ्र रंग
गोरा गोरा पान
लाल लाल डोळे
एवढे मोठे कान
मऊमऊ कसे अंग
नि एवढीशी मान
टुणटुण मारतात
किती छान उड्या
किंचीत आवाजाने
का घाबरतो गड्या?
लुसलुशीत गवत
आवडतो खायला
भुयारातली वाट
लपून बसायला
दोघेजण जोडीने
का बसले दडून?
आमच्यासंगे चला
खेळ खेळूया मिळून
