मला आवडत
मला आवडत
1 min
390
मला आवडतं केशरी, सुवर्ण रंगछटांनी नभांगण न्हाऊन निघत
प्रथम प्रहरी एकटक त्यास न्याहळणं मला आवडतं
थंड थंड गार वारा जेव्हा येतो अंगास झोंबवत
तेव्हा दोन्ही बाहू पसरवून झेलण्यास मला आवडतं
हिरव्या पर्णाआड पाखरु आपसांत कुजबूजत
कर्णमधुर त्याची वाणी ऐकण्यास मला आवडतं
विविध रंग,सुगंधाने नटून कळीतून सुंदर फुल उमलत
त्या पाकळ्या उलगडताना पाहण्यास मला आवडतं
सरीवर सरी पडताक्षणी चिंब चिंब भिजाव वाटत
मयूरपंख लेवूनी तालावर नाचण्यास मला आवडतं
निसर्गात तल्लीन होऊन मन माझं स्वैर बागडत
लोचनी क्षण करून गोळा साठवण्यास मला आवडतं