चिऊताई
चिऊताई
इवल्याशा पंखाची चिऊताई चिऊताई
सकाळी उठण्याची तुला ग किती घाई
चिवचिव चिवचिव सगळीकडे फिरते
तेच तेच बोलून तू नाही का ग थकते
काडी काडी वेचून घरटे बनविते छान
कुठे शिकली शाळा कलाकुसरीत महान
दाणा चोचीत घेऊन पिल्लांस भरते घास
इतके चकरा मारुन होत नाही का त्रास?
ठेवेन तुझ्यासाठी मी रोज रोज दाणा पाणी
बाळाला भरवून मग गात जा आनंदी गाणी
