STORYMIRROR

Aaliya Shaikh

Others

4  

Aaliya Shaikh

Others

सुधा मुर्ती

सुधा मुर्ती

1 min
567

मराठी, कन्नड, इंग्रजीच्या आहे एक प्रख्यात लेखिका

अति महत्त्वाची बाब की त्या उत्तम समाजसेविका

कार्य केवळ त्यांचे फक्त नव्हे मुळी गरिबी निर्मूलन

शिक्षण, आरोग्य आणिक उपक्रम महिला सबलीकरण

स्वभाव हा अत्यंत चंचल मिळविले सुवर्ण पदक

सुरुवात जीवनाची केली अभियंता नंतर प्राध्यापक

आवड साधे राहणीमान खर्च कशाला विनाकारण

हातभार समाज कार्यास अनावश्यक खर्चास कात्रण

लेखन अनेक पुस्तकांचे विकून करे मदत निधीतून

मुलींसाठी अनाथालयास खर्च पुरस्काराच्या रकमेतून

काम त्यांचे प्रेरणादायी निस्वार्थ सेवेत पुढाकार

आदर्श अशा योगदानास प्रदान पद्मश्री पुरस्कार


Rate this content
Log in