STORYMIRROR

Aaliya Shaikh

Romance

3  

Aaliya Shaikh

Romance

जाऊ नको दूर

जाऊ नको दूर

1 min
354

अबोला आर्त हाक या मनाची ऐक जराशी साजने

उगी धरला अबोला बरे नव्हे ग वागणे

केले सर्वस्वी बहाल एक कटाक्ष पाहता

वाजे संगीत मधुर सखे जवळ असता

बट कुंतली सारुन बघ एकदा प्रेमाने

हास्य तुझ्या मुखावर शोभे खळी पडल्याने

पाणीदार लोचनाच्या वाट पाहे इशाऱ्याची

किती स्तुती करु सांग फुलावानी या सौंदर्याची

सोड आता हा अबोला पुरे तुझा अट्टाहास

जाऊ नको दूर अशी जन्मोजन्मीचा ग दास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance