अबोल मन
अबोल मन
1 min
430
अबोल मन माझे
बसले कोपऱ्यात रूसून
का काही बोलत नाही
बघितले प्रयत्न करून
अबोल मन माझे
सुगंधी फुलासंग खेळायचे
पवनासोबत करून गट्टी
लावून पंख दुर दुर उडायचे
अबोल मन माझे
झाडावरच्या चिंचा तोडून
घेऊन सर्व सख्यांना
खायचे चोखून चोखून
अबोल मन माझे
उंच आकाशात उडायचे
घेऊन उंच भरारी
नयनरम्य द्रुश्य बघायचे
अबोल मन माझे
गरजूंना मदत करायचे
कुणाच्याही नजरेस न पडता
जीवनावश्यक वस्तू द्यायचे
अबोल मन माझे
एवढे गप्प का बरे झाले
एकांत दे ना जरा सोडून का
अशांततेचे थैमान आले
