STORYMIRROR

Aaliya Shaikh

Comedy

3  

Aaliya Shaikh

Comedy

हास्य कविता

हास्य कविता

1 min
452

काय सांगू तुमले माय 

बायकोसनी कटकट 

दिन रात बघे नयी 

सारखी करी वटवट 

मले म्हंती वाइस पानी 

आणा भाडं धुवाया

 नायी तर मिलणार नायी

 तुमले आयतं जेवाया 

गप गुमान राहूनसनी 

झाडलोट करा लागे 

पदर खोचून फिरं राही

 लाटन घेऊन माजं मांगे 

हाफीसात गेलं कि मंग

 किरकिर करी फोनवर 

फरमायीश सांगे सांगे

 थकीस नाय दिनभर 

पोरानांबी रातीचं मलेच 

साभांय करी लागे 

आपण मातर घोरी घोरी

 भुताटकी सारखं वागे

 लई झालो बेज्जास म्या 

ती मायरलाबी जायीना

 बाबो कसं हुईल माझं

 गळेहो तुमीबी सात देयीना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy