STORYMIRROR

Prem Gaikwad

Tragedy

3  

Prem Gaikwad

Tragedy

कुठे शोधू आई..

कुठे शोधू आई..

1 min
381

आठवण तुझी येते

कंठ दाटून आला,

सांग कुठे आई

शोधू मी तुला...


ना खाल्ली,पिलीस

का आम्हावर रुसलीस,

का गेलीस सोडून

काय मी गुन्हा केला?


कशी वेळ आली

नाही तुझी सावली,

जगावं कसं तुजवीण

आई कळेना मला...


कुठे शोधू, कुठे पाहू

अश्रू मी किती वाहू,

जन्म भर हवी होतीस

आई तू मला...


जन्मोजन्मी मला

हवीस तू आई,

तुझ्याच पोटी आई

हवा जन्म मला...


मागतो मी क्षमा आई

चुकलं असेल तर काही,

नाही तुझा देवाने त्या

न्याय ग केला...


झुरतो माझा जीव

पावला नाही देव,

सांग कसा भजू मी

कोणत्या देवाला...


कोसळला डोंगर

दुःख झाले फार,

लागली ही धार 

माझ्या डोळ्याला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy