आयुष्या
आयुष्या
दिसामाजी मासामंदी
काहीतरी लिहीत जाईन मी,
वहीविना पान उलटून
काही पाहायचे नाही..
कुणाच्याही आयुष्यात मला कुणाचे व्हायचे नाही
सवय कुणाचीही , न लागावी मला
लागलीच माझी कोणास तर ,
जबाबदार मी ठरायचे नाही..
कुणाच्याही आयुष्यात मला कुणाचे व्हायचे नाही
सोडवण्याइतपत बोटावर
किती असतात सोप्पी ही गणितं,
भावनांचे हिशोब आता वाणीतून वाहायचे नाही..
कुणाच्याही आयुष्यात मला कुणाचे व्हायचे नाही
मनावर कुणाच्या ओझे
आता द्यायचे नाही..
हे आयुष्या..
समजून घे इतुके तु आता
कुणाच्याही आयुष्यात मला कुणाचे व्हायचे नाही !!
कुणाच्याही आयुष्यात मला कुणाचे व्हायचे नाही !!