आधुनिक love ..
आधुनिक love ..
आधुनिक love ..
युग झालं modern,
बदल झाला "प्रेम" शब्दाचा;
"Love" या शब्दात.. तसंच अंतर वाढलं की हो या सुंदरशा नात्यात !
विसरली माणसं सगळी "राधा-कृष्णाच्या " प्रेमाला,,
पण आहे आपलं किती प्रेम हे कधीच दाखवलं नाही हो त्यांनी साऱ्या जगाला !
पण का कसं कळत नाही , उदाहरणं दिली जातात त्यांच्याच प्रेमाची ?
येईल का सर कधी आत्ताच्या पिढीला त्यांची ?
आत्ताचं love म्हणजे निव्वळ हक्क दाखवणं एकमेकांवर ,,
आधीचं प्रेम म्हणजे मात्र ; झोकून देणं स्वत: ला जोडीदाराच्या आनंदावर !
कदाचित माहित नाही यांना की अंत होत नाही कधी प्रेमाचा,,
पण त्यांच्या mode
rness च्या पायी त्यांनी अर्थच बदलून टाकला या नि:स्वार्थ भावनेचा !
सहज बोललं जातं I Love You
या युगात ; पण
प्रेमाची तिच सुंदर भावना उरलीये का हो सर्वांच्या मनात ?
व्याख्या केल्या अनेकांनी प्रेमाच्या अनेकच ,,
आणि त्या सर्वांचा अर्थ होतो वेगळा पण "त्याग" मात्र एकच !
अपवादात्मक....
आहेत अजूनही काही नाती त्या "राधा-कृष्णासारखी"
ना कशाची आस ,
ना कसलं बंधन ,
फक्त अतुट विश्र्वास....
पण या पिढीला कुठं माहिती असलं "प्रेम" मिळवण्यासाठी धरावी लागते फक्त आणि फक्त "त्यागाची" कास....!