सुंदर आठवणी..!
सुंदर आठवणी..!
मी पाहावं, अन् तु दिसावं,
अंतर दोघातलं कायमचं ते विरुन जावं...
अन् पाहता तुला प्रत्येक क्षणी ,
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडावं..
पाकळी अन् पाकळी ,
भिजावी जशी त्या दवांनी ,
तसाच गं साजनी घायाळ मी व्हायचो तुझ्या
देखण्या रुपाने...
का माहित नाही...
तुझ्या प्रेमात पडल्यावर;
मन त्या फुलपाखराप्रमाणं चंचल
होऊन जायचं...,
आवडत असला सगळ्या फुलांचा सुगंध जरी;
तरी, ते मात्र त्या खास फुलाचीच आस लावून बसायचं..
स्वप्नांत सगळं काही बोलून
जात असलो तरी समोरासमोर का मी
निःशब्द व्हायचो?
कदाचित जाणवतं असावं की,
तु समोर आल्यावर तुझ्या डोळ्यांतच सर्वकाही मी विसरुन जायचो...,
आजही त्या गुलाबी थंडीत,
मिठीत तुझ्या जग सारं विसरल्यासारखं भासतं..
क्षण तुझ्या सोबतीतले आठवले तरी,
अंगावर शहारा येऊन मन ओलचिंब न्हातं...
खूप रम्य वाटतात त्या भावना,
ज्यात तु अन् मी , अबोल असतानाही सारं काही बोलून जायचो,
अन् तुझ्या मात्र स्पर्शानं मी ;
पवनाच्या झुळुकाप्रमाणं वाहायाचो..
किती सुरेख नातं आहे आपलं;
एकाला त्रास झाला तर दुसरयाच्या डोळ्यात पाणी,
म्हणूनचं आयुष्याच्या वळणावर साथं देतील ..
त्या सुंदर आठवणी...
त्या सुंदर आठवणी...
