अबोल अबोल म्हणता म्हणता...
अबोल अबोल म्हणता म्हणता...
नातं कोणतंही असलं तरी,
त्यात प्रेम ही प्रांजळ भावना असावी,
कारण असता दुःखी आपण आपल्याला तीच व्यक्ती आपल्या जवळची दिसावी..
असता डोळ्यांत पाणी,
कोणीतरी समजू शकेल आपली वाणी,
असं कोणीही ज्याच्या मात्र आवाजाने आपलं मन शांत होऊन जाईल,
अन् अशा अनोख्या प्रेमाची परिभाषाच नवीन होईल..!
अबोल अबोल म्हणता म्हणता,
प्रेम बोलकं होऊन जाईल का..?
इतक्या सुंदर भावनेला कुणी,
सहजच व्यक्त करेल का..?
एक मात्र असावं; ते प्रेम म्हणजे नसावा नुसता हव्यास,
त्या गुलाबी भावनेला जपायला धरावी त्यागाची कास;
जेणेकरुन, जवळ नसली ती व्यक्ती तरी लागून राहिल तिचीच आस...!

