अशी तू
अशी तू
वाटे जवळची मला
लेखणी सखी तू अशी
किती आवडे मला ती
सांगू शब्दात कशी
भाव माझ्या मनीचे
तूच जाणिते क्षणात
झरझर शब्द झरती
जरा येताची मनात
तुज विना पळभर
मज सुचत नाही
नजरे समोर न येता
तुजला शोधत राही
किती काव्यात दिधली
तूच मजलाच साथ
लेखनात मला वाटे
तूच देतसे मला हाथ
तुझ्या बळावर रहाते
मी निवांत लेखनात
किती तू आवडे मलां
सांगु कुठल्या शब्दात

