कल्पनारम्य कविता..
कल्पनारम्य कविता..
सोबत नसतेस तरी ,
तुझा स्पर्श जाणवतो…
का? आजही हा जीव,
तुझ्यासाठी तळमळतो
हे प्रेमाचं असचं असत..
थोडसं अवघड अन थोडं सोप असत
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं.
हातात धरलेलं पाखरु अवचित सुटावं
तसा जीव सुटतो देहातून
कोणी त्या क्षणांची वाट बघतं..
कोणी धास्ताऊन जात मनातून
सांग सख्या , मी गेल्यावर
तुज माझी आठवण येईल का?
जाता जाता माझ्यासाठी तु,
दोन अश्रु गाळशील का?
होकारांला शब्दांना महत्व नसते
दाटल्या भावनांना काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची गरज नसते
होती लाही लाही झालेली तिची काया
आता रूप अन रंग हि उजळलेला
अशी पांघरली धरतीने हिरवाई
जणू हिरवा शालू नववधुने ल्यालेला
हा पहाटेचा पाऊस अन
माझे डोळे मिटलेले
तुझे माझे क्षण ओवताना मनात
काही क्षण सुटलेले
सोबतीला असे आज ही सांज ओली
अवेळी आठवांचे धुके दाटलेली…
ऋतू जीवघेणे किती विसरावे..
पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली
ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्याशिवाय
काहीच मागत नाही
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही..
माझे राहत नाही..

