STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance

3  

Shivam Madrewar

Romance

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुठे उरतात...

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुठे उरतात...

2 mins
296

तुझ्या पायातील पैंजण तुझी चाहूल देतात,

हातात वाजणाऱ्या बांगड्या तू आल्याचे सांगतात,

तुला पाहताच डोळे माझे भान हरवतात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुठे उरतात...

तुला पाहताच अनेक विचार फुलतात,

तुझ्या गुलाबासारख्या गालात खेळतात,

तुझ्या नाकात सोनेरी नथ खूप शोभतात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुठे उरतात...

तुझे प्रेमाने भरलेले डोळे माझ्याकडे पाहतात,

पाहताच मनात तुझ्या सौंदर्याच्या चारोळ्या सुचतात,

तुझ्या डोळ्यातलं काजळ हिरवा कंदील दाखवितात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुठे उरतात...

तुझ्या कानामध्ये सोनेरी झुबके झुलतात,

हवेचा झोका आल्यावर ते वृक्षाप्रमाने डुलतात,

या बोलक्या कवीला ते अबोल करतात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुठे उरतात...

तुझे ते स्मितहास्य चंद्राससुद्धा वेड लावतात,

तुझ्या आनंदामध्ये रंगीबेरंगी फुले उमलतात,

त्यामध्ये माझ्या चारोळीचे शब्द हरवतात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुठे उरतात....

आनंदीवेळी हातात हात तुझे पडतात,

एकटेपणात वेड्या मनाला तुझे शब्द साथ देतात,

तुझा मधुर आवाज ऐकवून थकवा मिटवतात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुठे गं उरतात......

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance