STORYMIRROR

Arun Gode

Romance

3  

Arun Gode

Romance

चाहूल

चाहूल

2 mins
185

तारुण्यातील सगळं काही विसरलो,

पण तुझी ती चाहूल व चुळबुळ नाही विसरलो.

मला ती का विसरता येत नाही,

हाच पेच जीवनात कधी सुटणार की नाही.

याचे उत्तर मला शेवटी मिळणार की नाही,

या प्रश्नाचे ओझे हलके कधी होणार की नाही.

महाविद्यालयात माझ्या बसण्याच्या जागेवरती,

जर कोणी अजून विराजमान जेव्हा होती.

तुला का संताप क्षणात येती,

हे कोणालाही माझ्याशिवाय का समजत नाही.

मला कधी उशीर झाला की तू अधीर होते,

तर तो तुझ्या वागण्यात का मलाच दिसतो.

तुझ्या प्रेमाची जाण फक्त माझ्या मनाला कळते,

हे माझ्याशिवाय कोणाला का अवगत नाही.

तुझे ते डोळे क्षणाक्षणाला चाहूल टिपते,

आतुरतेने वाट माझी तू सारखी बघत असते.

तुला न कळता हे तुझ्या मागेच बसून मीच बघतो,

हे माझ्याशिवाय कोणाला का समजत नाही.

तुझ्या या स्वच्छंद व निर्मळ वागण्याने,

माझी कशी तारांबळ व दाणादाण उडते.

हे कटुसत्य कोणाला का समजत नाही,

हे कटुसत्य मी का विसरु शकत नाही.

कधी तुझा मागच्या बाकावर मागे मी बसतो,

हळूहळू तुझी ती चाहूल व चुळबुळ वेग घेते.

हृदयस्पर्शी लांब वेणी लगेच पाठीवर झुलते,

केसांच्या स्पर्शानी माझ्या अंगात तरंग उठते.

मन माझे तुझा चेहरा दिसावा म्हणून हर्षुन जाते,

पुढ्च्याच क्षणी तू तिरप्या नजरेने मला बघते.

मी तुझ्या नेहमी सहवासात असावे,

यासाठी तुझे प्रयत्न जगावेगळे असते.

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कोणी नसावे,

यासाठी प्रत्येक संधीला तू उचलून धरते.

काळोखी प्रयोगकक्षेत प्रॉक्टिकल्ससाठी आतुर असते,

प्रॉक्टिकल्सच्या नादाने अंधारत प्रेमाचा वर्षाव करते.

आणी स्वतः लाजुनी, मग मंदमंद गालात हसते,

तुझे चाळे व चुलबुळ हे मला भावविभोर करते.

तुझे ते डोळे ह्या भावना मला व्यक्त करते,

आणि माझ्या भावना तुला माझ्या डोळ्यात दिसते.

किती सुंदर तुझा तो छंद मला आजही आठ्वतो,

वारंवार तू कशी उपकरणाची सेटींग बिघडवते.

आणि मला सतत ठीक करण्यासाठी प्रेरित करते,

अंधारात सुंदर गालावरची लट मला स्पर्श करते.

आणि तुझ्या त्या गरम श्वासाने मी थरकापतो,

हे मला का नेहमीच आजही जाणवते.

मनाने एक असूनही शरीराने वेगळे असावे,

कळलं हे का? हे सर्व अमान्य होते.

म्हणूनच तारुण्यातील सगळं काही विसरलो,

पण तुझी ती चाहूल, चुळबुळ व चाळे नाही विसरलो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance