पूर्वजांची कर्म व जन्म भूमी.
पूर्वजांची कर्म व जन्म भूमी.
पूर्वजांची कर्म व जन्म भूमी
वर्धा-बेभळा नदीच्या संगमावर एक ठिकाण,
नांदेसानवगी आहे एक धार्मिक पुण्यस्थान.
तीथेच होती माझ्या पूर्वजांची कर्म व जन्मभूमी,
वाडवडिलांचे बनले मोठे वटवृक्ष त्याच ठिकाणी.
वर्धा-बेभळा संगमाच्या जागी आहे उंचस्थान,
हेमाडपंती मंदीरात भगवान शिवजी विराजमान.
शिवपिंडीचे वंशज व गांवकरी करतात पूजन,
पूर्वज आणी संततीचे तेच निरंतर श्रध्दास्थान.
मंदीर परिसरात साधू-संतांच्या स्मारकांची आहे खून,
बाराव्या शतकातील मंदीरात शिवजीचे कायम स्थान.
साधू-संतांचे सदा असावे अस्तित्व त्या काळापासून,
इतिहासात दडले असावे त्यांच्या वास्तव्याचे प्रमान.
काही परिवार आजही पाळतात शिवजयंती आठवडादिन,
पूर्वजांची संतती आजही करतात दरवर्षी तीथे गांवभोजन.
भगवान शिवजीच्या कृपेने संततीचे होत आहे कल्याण,
शिवजयंती आठवडा दिवसी होते त्यांचे नेहमीच आगमन.
वर्धा नदीचे समोर पैनगंगेत होते विलीनीकरण,
आणी पुढे पैनगंगेचे होते प्रांतीगंगेत एकीकरण.
प्रांतीगंगा पुढे-पुढे जावून मिळते गोदावरीला,
गोदावरीनदी दक्षिण भारतीयांनसाठी जीवनदान.
शिव जयंती आठवड्यात भक्त करतात भजन,
भकतानंमध्ये उत्साहाचे निर्माण होते वातावरण.
भक्तगण करततात हफता भर निरंतर चिंतन,
शिवजयंतीला होते तीथेच दरवर्षी यात्रेचे आयोजन.
