नृत्य.
नृत्य.
नृत्य.
लाल-लाल लुगड्या दिसते तु फार सुंदर,
बघून तुला, मनी लागते सारखी हुर-हुर.
कधी-कधी दिसते वृत्ती जणू तुझी हल्लाखोर,
कोल्हापुरी मिरचीचा जसा वाजतो डंका व शोर.
लाल-भडक लुगड्यात तुझे नृत्य वाटते मनोहर,
मनाला लागते हुर-हुर व काळीज होते तडीपार.
माझ्या मनाला कसातरी बांधतो काल्पनिक दोर,
तरी मन असते अशांत पाहून सुंदर नृत्य निरंतर.
जेव्हा तुझ्या लुगड्याचा हवेत उडतो पदर,
तो मला हटकून नेहमीच करतो भावविभोर.
असेच बघत राहावे लावणी व नृत्य जीवनभर,
पीडित मन होते विचाराने तू कधीतरी थकणार!
सर्वच दिवस कधीच जीवनात एकसारखे नसणार,
जेव्हा-केव्हा मिळेल आनंदाची संधी मी ती लुटणार.
आज किंवा उद्या माझेपण डोळे असंदिग्ध थकणार,
मग तुझ्या सुंदर लावणी व न्यूत्यला मीपण मुकणार.
कला ही व्यक्तिवाला देते असाधारण धार,
कलाच वाढवते व्यक्तीची प्रतिष्ठा अपार.
कलेकडे बघण्याची असावी निसंशय नजर,
मग तीचा आनंद लुटण्याचे संधी मिळते फार.

