संभाजी.
संभाजी.
संभाजी.
राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजीनचे होते विधान,
शिवाजी नंतर संभाजीच होईल स्वराज्याचा राजन.
छत्रपती संभाजी सांभाळेल मराठा स्वराज्यचे शासन,
स्वराज्याचा संभाजी दावेदार शकितशाली व गुणसंपन्न.
संभाजी शिवाजीचे उत्तराधिकारी होणार होते सिंहासनासीन,
कारण स्वराज्यला पाहिजे होता राजा नेक व सर्वशक्त्तिमान.
संभाजी सारखा शुर-विर,पराक्रमि बहुजन प्रतिपालक व बलवान,
जनतेच्या सेवेसाठी जागृत,प्रामाणिक,कार्यक्षम व भावनाप्रधान.
संभाजी होता शुर-विर,पराक्रमी शिवाजीचा छावा महान,
राजमाता जीजाऊ आणी शिवाजीचा शिष्य तो गुनवान.
लहानपणीच अग्नीत तपून झाला होता लोखंडी चट्टान,
भाषा,कला,विद्या,योध्दा व धाडस यांची अनमोल खाण.
लहान पणीच बलाढ्य शत्रुना केले भूईसापाट स्वप्न,
वैदिक मनुवादियांना संभाचा करणे कठीन होते सामना,
संभासाठी षड्यंत्रकाऱ्यांनी निवडला होता मार्ग अपमान,
सगळीकडे केले निम्म,घृणित आरोपांचे खोल बीजारोपण.
लहानपणीच लिहला संस्कृतमध्ये राजनीतिवर ग्रंथ बुध्दभूषण,
नाभिकाभेद ,नखशिखा, सातसतक ग्रंथांचे केले अदभुत लिखान.
संस्कृत अन्य भाषा,युध्द कौशल, कुटनीतिचे उच्च कोटीचे ज्ञान,
प्रसिध्द संस्कृत पंडित गागा भट व कवी कलश झाले बघून हैरान.
