STORYMIRROR

Arun Gode

Inspirational

4  

Arun Gode

Inspirational

राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ

1 min
0

राजमाता जिजाऊ.

जिजाऊतुझ्या जन्माने महाळसाराणीचे फुलले आंगण

लखुजी राजेंच्या घराण्यात वाढली प्रतिष्ठा आणि शान. 

तुझे बहुआयामी व्यक्तिमत्त्व,संस्कारकर्तृत्ववीरता व ज्ञान,  

तीच होती राजे शाहाजीची मूळ शक्ती आणि प्रेरणास्थान.  

 

आजही तुझी विचारधारा आणि मार्गदर्शन

लाखो भारतीयांसाठी आहे प्रधान प्रेरणास्थान. 

तुझी कार्यक्षमता आणि नेतृत्व इतके महान

तूच विदर्भाची आणि स्वराज्याची पावणस्थान. 

 

शिवाव्येंकोजी आणि संभाजीला दिले अनुशासन,

 सुसंस्कारअक्षरज्ञान आणि सैन्य प्रशिक्षण. 

इतिहासभूगोलधर्मवेदिक संस्कृतीकृषिपुराण,

 अर्थवेदविज्ञानमुत्सरीभाषा आणि शस्त्रज्ञान.

 

विदेशी हल्लेखोरांची दिली शिवाला जाणीव खरी

आदिलशाहीमुघलब्राम्हणशाही यांची केली स्मरण. 

तुझ्या अथक प्रयत्नांनी शिवा झाला पोलाद

सेना आणि स्वराज्याला मिळाले सुदृढ प्रशासन.

 

 

स्वराज्यात पुन्हा नांदेल भूमिपुत्रांची आदर्श सभ्यता,

 संस्कृती आणि परंपरेचा वाटेल अभिमान. 

समतान्यायसहिष्णुता आणि बंधुभावना

स्वराज्यातील प्रजेला मिळणार संपूर्ण संरक्षण. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational