STORYMIRROR

Arun Gode

Abstract

4  

Arun Gode

Abstract

प्रथम प्रशिक्षित शिक्षिका

प्रथम प्रशिक्षित शिक्षिका

1 min
0

                                     प्रथम प्रशिक्षित शिक्षिका

गुलाम भारतात स्त्री शिक्षणासाठी झाले आंदोलन,

पुण्यातील दोन महिलांचे त्यात होते मोठे योगदान.

पहिली सावित्रीबाई फुले, दुसरी फातिमा शेख,

दोघींची ओळख प्रथम प्रशिक्षित शिक्षिका म्हणून ठळक.


धर्म, संस्कार, घरगुती वातावरण होते भिन्न,

परंतु महिला शिक्षाका बनणे होता एक मात्र उदिष्ट.

दोघींची होत्या त्या काळात सामाजिक परंपरांनी पीडित,

तरी मोठ्या धैर्याने केले स्त्रीशिक्षनाचे कार्य महान.


दोन्ही महिलांचे कार्य होते समान आणि वैभवपूर्ण,

फातिमाला इतिहासात मिळालेले नाही योग्य स्थान.

फातिमामुळे शक्य झाले सावित्रीचे शिक्षिका प्रशिक्षण,

अहमदनगरमध्ये दोघीनी पूर्ण केले शिक्षिका प्रशिक्षण.



क्रांतिसूर्य फुले जोडप्याचे सर्वच गातात गुणगान,

प्रथम बालिका शाळेला फातिमाच्या भावाने दिले योगदान.

फुले जोडप्याच्या वडिलांनी परंपरेच्या दबावाखाली त्यांचे निर्वासन,

जोडप्याला आश्रय आणि शाळेला जागा देण्यात उस्मानाचे योगदान.


बहुजनांच्या कामाला उच्चजाती मानत नीच आणि श्रेयहीन,

त्या काळचे इतिहासकारांनी त्याला दिले नाही योग्य स्थान.

पण सावित्रीला शिकवण्याशिवाय होता अद्वितीय छंद लेखन,

लेखनीमुळे सावित्रीला मिळाली इतिहासात योग्य ओळख व मान.


फातिमा देखील होती प्रथम प्रक्षिशीत शिक्षिका प्रतिभावान,

सावित्री इतकेच तिचे स्त्री शिक्षणात अहम योगदान.

लेखनी अभावी तीला नाही मिळाला सावित्री इतका मान,

म्हणून इतिहासाच्या पानांत फातिमाची ओळख दिसते किमान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract