STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract Others

4  

Manisha Awekar

Abstract Others

हुंडा नको गं बाई!!

हुंडा नको गं बाई!!

1 min
383

हुंडा नको गं बाई

हिला हुंडा नको गं बाई

अगं पण असं का?


सुशिक्षित नव-याची

मी साधीभोळी बायको

(अगं बाई खरं की काय!!)

माझी मुलं म्हणजी अक्षी

सदगुणी हाईता सांगतो

मग हुंडा कशाला बाई?

मला हुंडा नको गं बाई


घर माझं हाय लई मोठं

पण फर्निचरविना रितं

(अगो असं कसं गं बयो)

फर्निचर घडवा गं बाई

एवढं मागणं पुरवा गं बाई

मला हुंडा नको गं बाई

मला हुंडा नको गं बाई


सोनं चांदी लई बक्कळ

वाटणीत येतील माईंदळ

(अगं दे की वाटणी भावकीला)

दहा तोळे सोनं घाला गं बाई

मला हुंडा नको गं बाई


नको विहिणीचा मानपान

नको काही देणंघेणं

(अगं असं का गं बाई?

हाईस तू मानाची वरमाई!!)

एक मजला चढवा गं बाई

मला हुंडा नको गं बाई


अगं बाई किती हे मागणं बाई.

शिकलेल्यांना हे शोभत न्हाई

हिला सगळंच हवं गं बाई

हिला सगळंच हवं गं बाई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract