STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract Others

4  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Abstract Others

#सवाल माझा रोखठोक...

#सवाल माझा रोखठोक...

1 min
523

मज्जा रे दगडोबा तुझी!....

रोज तुला येतो नैवद्य खास

इकडे जरी पोटात माझ्या ,

एकही नसे अन्नाचा घास


भुकेसाठी बघ ना रे,

फिरतो किती मी वणवण..

भुकेलेल्या ना देई कोणी,

इथे तुझी मात्र साठवण


परी तु सखा माझा,

दया माझ्यावर दाखवतोस

खात नाहीस काही स्वतः,

राखून माझ्यासाठी ठेवतोस


मला पण देवा आता,

दगडाचा देव बनव...!

येऊ दे रे तुला तरी,

माझी थोडीशी कणव


भुकेल्याला द्यायला बघा

मागेपुढे बघती लोक.....

दगडोबाला कां पंचपक्वान्न?

सवाल माझा रोखठोक....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract