आठवण
आठवण


आत आत रोज कोण बोलत राहतं
काहीतरी चुकतय हो सांगत राहतं !!
अंग मोडून काम करतोय ना मी रोज
तरीही महत्वाचं काही खुणवत राहतं...
कशीबशी दिवसाची होते बरी सुरुवात
रात्र होताच कसं सगळं पसरत राहतं !
नव्याने रोज नवी गणितं बांधतो मी
हिशोबात बसणारं तेच निसटत राहतं...
आवरून ठेवावा काय विस्कटलेला संसार
एकहातीच मन प्रश्न विचारत राहतं !
साथीला बसलेले नेमके वेळेलाच पांगले
पाठीशी कोण मन विवंचना करत राहतं...
कसे करावे संस्कार ह्या दूरच्या नात्यांवर
नातंच नाममात्र जीथं असं विरहत राहतं!
फुलांसारखा ऊमलून येतो पुन्हा क्षण नवा
चेतनच्या गझलांना आधार देत राहतं !!