भावना
भावना
तू भुकेला शब्दांचा
मी रीता भावनांचा
काचेतील चंद्र ताऱ्यांनी
खेळ मांडला रात्रीचा
मृगजळ धाडते उशास
नटिके क्षणभंगुर स्वप्नांच्या
रोज डाव मांडलेला
हरलेल्या चार पत्यांचा
केला त्याग अश्रूंनी
रोज रडणाऱ्या डोळ्यांचा
बोटाने दाखवणे सोडले
दिशा हरवलेल्या रस्त्यांच्या
कवितेत चेतन माळतो
भाव हरवलेल्या भावनांचा
