जोवर मी आहे
जोवर मी आहे
1 min
204
चार अश्रू वाहुनी घे रे जोवर मी आहे
मनातले सारे मागुनी घे रे जोवर मी आहे
कोण पाहतो उदयाला ठाऊक कुणास नाही
जवळ बसूनी बोलूनी घे रे जोवर मी आहे
कुठे कुठे काय ठेविले शोधशील गेल्यावरती
हृदयातले हृदयी साठवूनी घे रे जोवर मी आहे
नकोस शंका ठेऊ उरी जुन्या शपथा-वचनांची
एकाच आपण, जाणुनी घे रे जोवर मी आहे
कश्यास कुणाला लावावा बोल, बोल तुझे नी माझे
उरा उरी भेटूनी घे रे जोवर मी आहे
सापडतील मग पाऊलखुणा राख होईन तेंव्हा
सोबत पावले चलूनी घे रे जोवर मी आहे
जाताना सांगतो एकच तेवढे सोडू नकोस देणे
समान हा धागा बांधुनी घे रे जोवर मी आहे
