जीवन
जीवन
सुखाने मिटावे डोळे
मी येथून जाताना
मागे काही न उरावे
मला तू पाठवताना
अश्रू झिरपू नयेत
उगाच व्यर्थ माझ्याकरिता
मोत्यांचा हिशोब होतो
पाप-पुण्य मोजताना
तजवीज करून ठेवली
मीच चार खांद्यांची
दारोदारी नकोस भटकू
येतील स्वतः हून पोहचवताना
सरणावर चढलो आहे
आता माघार नाही
फिरून नाही जन्मणार
तू व्याकूळ बोलावताना
आता आधार आठवणींचा
साथ तुला एकट्याची
हवा होता ना एकांत
सारे वैभव भोगताना
