STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance

4  

Author Sangieta Devkar

Abstract Romance

प्रत्येक क्षणात

प्रत्येक क्षणात

1 min
236

 तू सामावला होतास माझ्या प्रत्येक क्षणात. 

तुलाच नवहती त्याची जाणीव ,तू माझ्या रोमारोमात.


दूर होता जरी तू, कायमच मी तुला माझ्या जवळ अनुभवल.

प्रेमाचे बंध असे तूटत नसतात हेच मी तुज्या नजरेत पाहिलं.


खुप सोसले तुझ्या शब्दाचे घाव मी, पण नाही जाणिले तू कधी.

मी तुझ्या क्षणात,मनात वेड्या डोकावून तुझ्या अंतर्मनात पाहिलेस का कधी?


किती तरी तुकडे केलेस हृदयाचे तू माझ्या,

पण ओठावर कायम माझ्या हासूच पाहिलेस तू.


तुझ्या सोबत जगण्याचा ध्यास मला होता.

तुझ्या प्रत्येक क्षणात मला माझा भास होत होता.


पूर्णपणे विस्कलटलेली मी,तुझ्यात गुंतण्याचा हा त्रास होता.

तू होतास सभोवताली का उगाच हा वेडा माझा भास होता.


रिक्त तू रिक्त मी का पूर्णत्वाचा हा नुसता देखणा आभास होता.

कसे सांगू तुला कुठे आणि कसा तू माझ्यात संपूर्ण होता.


तुझ्या साठीच तर वेड्या माझ्या आयुष्याचा जोहार केला होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract