तु आणि ती
तु आणि ती
आज एक गंमतच झाली
कोणीतरी विचारले ..
तु पहिल्यासारखी नाही राहिलीस?
'तु' बदललीस... आम्हाला 'ती' तू खूप आवडतेस.. !!
काय करू ...
सगळ्याच गोष्टींचा हिशोब करणारे समोर येत गेले ...
मग 'मी' पण हिशोबी होत गेले.
काय करू ...
आसवे कधी कुणाला दिसलीच नाहीत..
मग 'मी' पण बेरड होत गेले.
काय करू ...
मायेचा तो स्पर्श खूप शोधला...
पण परत तो ओलावा मिळालाच नाही..
मग 'मी' पण कोरडेपण स्वीकारत गेले.
काय करू ...
या व्यावहारिक जगात सगळेच काट्यावर चालणारे पाहतेय...
मग 'मी' पण ताटावर बसून तासन्तास खरकटे हात घेऊन वाट पाहत नाही.
पण बरं झालं..,
या प्रश्नाने जाणीव झाली की..
होतो 'आपणंही' कधीतरी निष्पाप, निष्कलंक..
आहेत की यालाही साक्षीदार..!!
आनंदही वाटतो ..,
की सगळ्या विकारांचा अनुभव घेतल्यानंतर..,
जो एक वेगळा प्रवास सुरू होतो..,
त्या 'निर्दोष देवत्वाच्या' समीप जाण्याचा..,
तो फक्त स्वतःचा असतो.
