STORYMIRROR

bhagyashri kulkarni

Others

3  

bhagyashri kulkarni

Others

ओवीबद्ध जीवन

ओवीबद्ध जीवन

1 min
182

लुगडं गेलं मागं, अंगावर आली साडी 

कपाळावर शोभे आता, टिकल्यांची चढाओढी.


घासू घासू तवा गेला, गोड लागे जळकी भाकर 

आणिला नॉनस्टिक पॅन, वाढे शरीराचा भार.


इनडोअर बगीचा केला, हौसेचा बयोने 

मातीशी नाते जोडते, माडी वरच्या घराने.


सौख्य आणाया लक्ष्मी, निघाली घराबाहेर 

उंबरठ्यावरचे तुळस, कोमेजली पाण्यावाचून.


कोसावरले जमवले, बोलाया व्हाट्सअपने

पावलावरले गमावले , अवधीच्या अंतराने.


नामजपाची किमया, माजघरातल्या माठात

भरली माया घोटाघोटात, नव्हे भय संक्रमणात.


Rate this content
Log in