आणि जन्म होतो कवितेचा
आणि जन्म होतो कवितेचा
येता जाता
जाता येता सल्लेच सल्ले..
आता ऐकून घेण्याचे मात्र, वय नाही राहिले.
ऐकण्याची भूमिका म्हणजे,
अनुभव शून्य असतो..असे नसते,
दूर बसून मनोरे बांधणाऱ्यांचे
खूप आश्चर्य वाटते.
कसेही वागले तरी दोष आहे आपलाच..,
कसेही वागले तरी दोष आहे आपलाच..,
अहो,
ठरवून दूर राहण्याचा खेळ माझा फसलाच...
तोच,
एक घटना घडते आणि
जन्म होतो कवितेचा..
मुखमस्तीचे धारदार आघात ..
व्यक्त करायलाही शब्दांचेच प्रतिघात..
'स्वहिताचे स्वातंत्र्य' आहे ज्यांचे अस्तित्व..,
लोका सांगे 'काळजी' घेण्याचे ब्रम्हतत्व.
मी,माझे,मला याशिवाय जगंच नाही दुसरं..,
मायेच्या पडद्यामुळे दिसतंच नाही तिसरं.
आज मात्र बांध तुटले..,
दोषारोपांचे गोळे एकमेकांवर फेकले.
आग शांत झाली खरी,
पण निखाऱ्यांची निर्माण झाली खोलवर दरी.
म्हणून वाटतं,
आतमधे इतकेच शिरायचे..
की बाहेर सहज येता आले पाहिजे.
नाहीतर आपलीच नाती, आपलेच गुंते,
ऋणानुबंधाची वाढ मात्र खुंटते.
