सत्य
सत्य


अद्ययावत भ्रमणध्वनीच्या संवेदनशील पटलावरून बोटे फिरवणाऱ्या
असंवेदनशील माणसातल्या माणुसकीची हीच संवेदनशीलता
अडचणीत असणाऱ्या माणसांना मदत करण्याऐवजी त्यांची छायाचित्रे
काढून ती सगळ्यात अगोदर प्रसिद्ध करतो आणि मारतो खोटी फुशारकी
सोन्यासारख्या पृथ्वीची वाट लावून आम्ही शोधतो आहोत या आकाशगंगेत
वसतीसाठी नवा ग्रह अब्जावधी पैसे खर्चून अंतराळात याने पाठवतो पण
दीन, गरजूंना मात्र वंचित ठेवतो आणि मांडतो त्यांचाही बाजार
मनुला झाला आहे असमाधानतेचा आजार
आणि मुख्य म्हणजे त्याला हे कळत पण वळत नाही
 
;कारण आम्हाला रमायला आवडत स्वप्नात आभासी जगात
कारण सत्य आणि वास्तवात आम्ही जगूच शकत नाही.
फिरतो आम्ही वापरून विमान, दुचाकी, चारचाकी
परंतु असतो मात्र एकाकी
सत्य शोधता शोधता थकल विज्ञान
सत्य काही मिळत नाही चिवडत बसतो अज्ञान
अन मग एके दिवशी होतो साक्षात्कार
हे सगळ फोल असल्याचा तो पर्यंत वृद्ध झालेलो असतो आपण
शिणलेली असतात गात्र अन्न कमी आणि गोळ्या जास्त
व्याधींनी पोखरलेल असत आपल्या शरीराला
मग कदाचित नैराश्याच्या आधीन होऊन करत राहतो प्रतीक्षा
अंतिम चिरंतन सत्याची ...............मृत्यूची