तया भेटे पांडुरंग
तया भेटे पांडुरंग
थिरकली पाऊले सोबती टाळ आणि मृदंग
सभोवती नामाचा गजर चित्त झाले दंग
असे ज्याचा भाव अभंग
तया भेटे पांडुरंग ........ १
पंढरीची वारी
कलियुगी तारी
पुंण्याची खातरी
असे ज्याचे शुद्ध अंतरंग तया भेटे पांडुरंग .....२
ऐसा आषाढीचा सोहळा
पाहिला मी माझ्या डोळा
सरले पाप आणि पुण्य
होई जो नि:संग तया भेटे पांडुरंग ......... ३
