मध्यमवर्गाचे वास्तव
मध्यमवर्गाचे वास्तव
1 min
255
आयुष्याची साचेबंद चौकट
घरी बायकोची वटवट
तर ऑफिसात साहेबाची कटकट
परिस्थिती आहे फारच बिकट
श्रम आणि अर्थ याचं
गणितच व्यस्त आहे
मंदी आणि महागाईन
जनता त्रस्त आहे
महिन्याचा सुरवातीचा रुबाब
ओसरतो पंधरवड्यातच आणि
वास्तवाची जाणीव होते
तिसऱ्या आठवड्यातच
चौथा निभतो खिशातल्या चिल्लर
आणि घरातल्या राद्दीवर
डोळा असतो पुढच्या
पगाराच्या सद्दीवर
