STORYMIRROR

Sayli Kamble

Abstract Inspirational

4  

Sayli Kamble

Abstract Inspirational

शोध स्वत:चा

शोध स्वत:चा

1 min
362

खुप शोधलं तुला, माझ्यातल्याच मला

इथेच तर असतेस, म्हणून ग्रुहित धरलं का तुला


मी कायम सोबत असेन असं मीच सांगितल होत

हात कसा सुटत गेला माझं मलाच कळत नव्हत


खुप दूर गेले का, इतरांसाठी करताना

दिसतच नाहिस तू आता, मागे वळून पाहताना


खुपच दमछाक झाली, पण कुणालाच दिसली नाही

म्हणूनच कदाचित आता मला तुझी आठवण आली


जस मी तुला ग्रुहित धरल तसच इतरांनी मला धरलं

उशिरा का होईना पण मला आता ते उमगलं


अगदिच स्वाभाविक आहे तुझं माझ्यावर रूसणं

पण तितकच महत्त्वाचं आहे माझं तुला भेटणं


जेव्हा सोबत होतो तेव्हा ओळख होती स्वत:ची

तुझ्या नसण्याने जाणवते कमी अस्तित्वाची


दुसर्यांसाठी झिजणं हयात तसं काहि गैर नाही

पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहिच अर्थ उरत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract