उपकार..
उपकार..
साऱ्या दुनियेचं करुनी भलं
माझं मात्र झालं सारच वाटोळं ,
नातीगोती जपली जीवाच्या पल्याड
मोठ्यामनानं दान सारच केलं .
स्वार्थ नाही पाहिला कधीच कुठं
झालो भिकारी करून मन मोठं ,
झालो कंगाल,पहावेनात हाल
गणगोत सारच, दूर आज झाल .
खूप केली लोकांवर,दया अन् माया
तेच आज सारे लागले दूर जाया ,
होते सारे माझे,कोणीच आज नाही
कळंलं आज कोणी कुणाचं नाही.
ठेवावा कसा कुणावर भरोसा
इमान जप स्वार्थी माणसा ,
आले दूःख दाटून, ढाळीतो अश्रू
तुमचे हे उपकार,कसे मी विसरु...!
