समर्पण
समर्पण
पाने झडली फुले गळली..
झाड आता बोडके झाले सावली त्याची उपभोगणारे आता मात्र दूर गेले..
झाडाकडे ढुंकूनही न पाहता पुढे पुढे जाऊ लागले..
कुऱ्हाडीचा घावाने लचके झाडाचे तोडले..
स्वार्थाच्या आगीत मानवाने झाडाला भस्मसात केले..
झाड मात्र हसते आहे..
स्वत:शीच बोलते आहे..
अजूनही आहे गरज माझी कुणाच्यातरी पोटासाठी..
सुकलेल्या लाकडाची जळण म्हणून जळण्यासाठी.
जळण्यातही तृप्ती आहे म्हणून अन्न शिजते आहे..
मानवाच्या पोटाची आग शमविण्यासाठी लाकूड मात्र आतुर आहे...
जळता जळता समाधानाने निखाऱ्यांची धग सोचते आहे..
तरीही झाड आतूर आहे पुनर्जन्म घेण्यासाठी..
पाने फुले फळे अन्
ऊन-वादळ सोसून पांथास सावली देण्यासाठी..
अन् शेवटी सरणावर जाण्यासाठी..
ज्याने तोडले लचके..
त्यालाच मुक्ती देण्यासाठी..
त्यालाच मुक्ती देण्यासाठी..!!
